Chinchwad : गल्लीत येऊ न दिल्याने महिलांना शस्त्राचा धाक दाखवत दिली धमकी; आरोपींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गल्लीत येऊ देत नाही का, असा जाब विचारत (Chinchwad) चार जणांनी मिळून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने ढकलून दिली. तसेच महिलांना शिवीगाळ करत चाकू व तलवारी हातात घेऊन धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास बळवंतनगर, चिंचवड येथे घडली.

चैतन्य शिवाजी रुपनार, सुनील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), शाम कोळी, सौरभ शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या गल्लीतील एका महिलेचा वाढदिवस असल्याने फिर्यादी व इतर (Chinchwad) महिला फिर्यादी यांच्या घरासमोर एकत्र जमल्या होत्या.

Metro : अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता

त्यावेळी तिथे आरोपी आले. चैतन्य याने चाकू तर अन्य आरोपींनी तलवार घेऊन परिसरात येऊन रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने ढकलून दिली. त्यांनतर फिर्यादी आणि इतर महिलांना शिवीगाळ करून ‘तुमच्या गल्लीत येऊ देत नाही काय’ असे म्हणून बघून घेण्याची धमकी देऊन आरोपी पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.