Chinchwad: नदी किनारी मिस वर्ल्डच्या उपस्थितीत महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ आणि सुंदर सांडपाणी विरहित पवनामाई उगम ते संगम अभियाना अंतर्गत शहरातील दिशा फौंडेशन, पवना जलमैत्री अभियान आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे आणि ग्रीनशोरा या संस्थांनी एकत्रित येऊन शहरातील निसर्ग संवर्धनासाठी काम करणा-या 42 नारीशक्तीचा सन्मान 500 निसर्ग प्रेमींच्या उपस्थितीत केजुबाई बंधारा येथे नदी किनारी नुकताच करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुण्या मिस वर्ल्ड युक्ता मुखी, पर्यावरण तज्ज्ञ केतकी घाटे, मानसी करंदीकर, शैलजा देशपांडे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका झामाबाई बारणे, करुणा चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, अर्चना बारणे, माया बारणे उपस्थित होते.

  • यावेळी रोटरी क्लबच्या पवना नदीवरील आजवरच्या कामांचे ‘व्हिडीओ चित्रीकरण’ सुयोग वाल्हेकर यांनी सर्व निसर्ग प्रेमींना दाखवले. या सर्व नारी शक्तीला समर्पित ‘रखुमाई रखुमाई तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना” हे गीत रश्मी भावे, ऋचा कानेटकर आणि स्वाती वाल्हेकर यांनी सादर केले. संदीप कुमठेकर यांनी माऊथ ओर्गणने कार्यक्रमात रंगत आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.