Chinchwad : दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना थरमॅक्‍स चौक येथे रविवारी (दि. 17) घडली.

अभिजित बबनराव काटकर (वय 40, रा. संभाजीनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास थरमॅक्‍स चौक येथे अभिजित काटकर यांची दुचाकी घसरली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिजित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.