Chinchwad : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – काम शोधण्यासाठी (Chinchwad) घराबाहेर पडलेल्या तरुणाने आईला फोन करून, ‘मी झाडावर बसलो आहे, मला न्यायला या’ असे सांगत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी थेरगाव येथे घडली.

प्रमोद राजेंद्र कुशवाह (वय 19, रा. जय भवानी कॉलनी, सोळा नंबर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते.

मात्र तुमचे लग्नाचे वय झालेले नाही, असे सांगत त्या दोघांची कुटुंबीयांनी समजूत घातली होती. यामुळे मागील दोन दिवसांपासून प्रमोद अवस्थ होता.

Pune : नेतृत्वाद्वारे गुरुश्रींनी विद्यार्थ्यांना शिकवले जबाबदारी घेण्याचे महत्व

सोमवारी सकाळी तो काम शोधण्यास जातो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने आईला फोन केला. ‘मी आत्महत्या करण्यासाठी बिर्ला हॉस्पिटल जवळील नदी किनारी झाडावर बसलो आहे, मला न्यायला या’, असे सांगितले.

घरातील व्यक्‍तींनी त्याचा चिंचवडमधील नदी किनारी शोध घेतला असता थेरगाव घाटाजवळ प्रमोद गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. चिंचवड पोलीस तपास करीत (Chinchwad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.