Pune : नेतृत्वाद्वारे गुरुश्रींनी विद्यार्थ्यांना शिकवले जबाबदारी घेण्याचे महत्व

एमपीसी न्यूज – नेतृत्व या विषयावर ( Pune ) विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गुरुश्री एस.जे. यांनी 4 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध उदाहरणांतून गुरुश्रींनी विद्यार्थ्यांना नेतृत्व ही संकल्पना समजावून सांगितली. नेतृत्व करणारा लीडर हा नेहमी सेवाभावी वृत्तीने प्रत्येक काम जबाबदारीने कसे पूर्ण करतो हे सांगितले तसेच प्रत्येक व्यक्ती ही लीडर होऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांनी ठसवले.

India News : इंडिगो खरेदी करणार 500 विमाने; इतिहासातील सर्वात मोठी खरेदी

अशी कोणती गोष्ट आहे जी पूर्ण झाली नाही किंवा नीट झाली नाही तर तुम्हाला चालणार नाही? या प्रश्नाचे उत्तरातून प्रत्येकाला आपण ज्याचे नेतृत्व करायचे आहे ते क्षेत्र सापडू शकते असे गुरुश्रीनी सांगितले.

यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे नेतृत्वगुण कोणत्या क्षेत्रात वापरायचे आहेत हे समजले. आपल्यातील नेतृत्वगुणांचे विकसन करताना आपली प्रगती मोजायची पद्धतदेखील गुरुश्रींनी शिकवले. प्रत्येक आठवड्यात या पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला गुरुश्रींनी विद्यार्थ्यांना दिला.

16 ते 26 वयोगटातील अनेक कॉलेजमधील विद्यार्थी प्रत्यक्ष आणि virtual माध्यमाद्वारे या सत्राचा लाभ घेतला. या सत्रात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना “आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घेऊन आपण आपल्या जीवनाचे नेतृत्व करू शकतो”, हा बहुमूल्य संदेश या स्तरातून मिळाला. पुढील सेशन “How to build confidence?” या विषयावर 6 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे आयोजकांनी ( Pune ) सांगितले. नेतृत्व या विषयावर सत्र

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.