Hinjawadi : मारहाण करताना सोडवले म्हणून एकावर हत्याराने वार

एमपीसी न्यूज –  सात ते आठ जण एकाला ( Hinjawadi)  मारहाण करत होते. यावेळी एका तरुणाने त्याला आरोपीच्या तावडीतून सोडवले याचा राग आल्याने टोळक्याने तरुणाच्या डोक्यात हत्याराने जीवघेणा वार केला.ही घटना रविवारी (दि.18) माण रोड माण येथे रात्री उशीरा घडली.

याप्रकरणी सतिश विठ्ठल कांबळे (वय 32 रा.हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून विशाल काकडे व त्याचे 7 ते 8 साथीदार यांच्यावर मारहाण व खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे थांबलेले असताना आरोपी व त्याचे साथीदार एकाला बेदम मारहाण करत होते . यावेळी फिर्यादी यांनी त्याला आरोपीच्या तावडीतून सोडवले.

यावेळी आरोपींनी चिडून फिर्यादीलाच लाकडी काठ्या व हत्याराने मारहाण करत डोक्यात वार करत गंभीर जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Hinjawadi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.