Pimpri News : महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पहिल्या फुफ्फुसाच्या बिलबोर्डचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणची वायू प्रदूषण पातळी जाणून घेण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी (Pimpri News) पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज शुक्रवारी शहरातील पहिल्या फुफ्फुसाच्या बिलबोर्डचे ( वायु गुणवत्ता दर्शक फलक)  उदघाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. आणखी तीन ते चार ठिकाणी हे बिलबोर्ड (वायु गुणवत्ता दर्शक फलक) बसवण्याचा विचार आहे अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

हवेतील प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच हवेचे दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि परिसर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसवण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या फुफ्फुसाच्या बिलबोर्डचे ( वायु गुणवत्ता दर्शक फलक) उदघाटन आयुक्त शेखर सिंह यांनी आज सकाळी केले आहे.

सिंह म्हणाले की महानगरपालिका असे बिलबोर्ड तीन ते चार ठिकाणी बसवण्यासाठी फंड्स देईल. या बिलबोर्ड मुळे त्या त्या ठिकाणची वायू प्रदूषण पातळी कळेल. या माहितीची तुलना करून शहरातील वायू प्रदूषणाची नेमकी स्थिती कळू शकेल. त्यासाठी पर्यावरण विभागाने काम करावे.

Pune News : “न्यूझीलंड मध्ये नोकरी लावून देतो” असे आमिष दाखवत पुण्यात उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक

सिंह म्हणाले की पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वायू प्रदूषण आहे पण ते जाणवत नाही. अति वायू प्रदूषण झाले की ते जाणवते. आपल्याला वायू प्रदूषणाची ऍलर्जी असून दिल्लीला गेल्यावर तेथे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांना जाणवते. त्यामुळे वायू प्रदूषण कमी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

श्वेता वेरणेकर, वरिष्ठ प्रकल्प समन्व्यक यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या बिलबोर्ड बद्दल माहिती देताना सांगितले की ह्या बिलबोर्ड मधील फुफ्फुस  हे मास्क च्या कपड्याने बनले असून त्यांचा रंग वायू प्रदूषणामुळे बदलेल. हा बिलबोर्ड एक महिनभर राहील व त्यामुळे येथील वायू प्रदुषणाबद्दल कळेल. (Pimpri News) या बिलबोर्डमुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना, वाहन चालकांना येथील वायू प्रदूषणाची पातळी कळेल. नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी येथील बिलबोर्ड वरील वायू प्रदूषण पातळी पाहून येथे येऊन वायू प्रदूष्णावर चर्चा करावी व हे प्रदुषण कसे कमी करता येऊ शकते यावर उपाय योजनांवर चर्चा करावी व प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेची मदत करावी.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या श्वसनरोग विभाग प्रमुख दिपाली गायकवाड यांनी यावेळी लहान मुले व वयस्कर नागरिकांवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली.(Pimpri News) माणसाच्या शरीराच्या सर्व भागांवर वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम होतात. त्यांनी सांगितले की, लहान मुलांचे फुफ्फुस हे पुर्णपणे विकसित होत नाहीत. वायू प्रदूषणामुळे विविध प्रकारचे आजार होतात. त्यामुळे वायू प्रदूषण कमी करण्याची गरज आहे.

संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग यांनी आभार मानले. त्यांनी सांगितले की, शहरातील चार ठिकाणी आयआयटीएमने वायू प्रदूषण पातळी मोजण्यासाठी उपकरणे लावली आहेत. त्याची माहिती महानगरपालिकेला मिळत असते. पर्यावरण विभाग वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काम करत आहे.

निळु फुले कला अकादमी च्या पथकाने वायू प्रदूषणबाबत जनजागृती करण्यासाठी भारूड सादर केले. त्यांनी यामध्ये वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या विविध आजारांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.