Pune News : “न्यूझीलंड मध्ये नोकरी लावून देतो” असे आमिष दाखवत पुण्यात उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक

एमपीसी न्यूज : मल्टी नॅशनल कंपनी मध्ये वरिष्ठ पद (Pune News) मिळवून देतो असे सांगत 58 वर्षीय व्यक्तीची तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  याप्रकरणी 58 वर्षीय व्यक्तीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र, रिचर्ड अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही नावं ईमेल आय डी वर वापरली असल्यामुळे या नावांची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार मार्च 2022 ते एप्रिल 2022 मध्ये घडला. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र आणि रिचर्ड यांनी फिर्यादीला बेयर कॉर्पसायन्स व मिनिस्ट्री ऑफ बिझिनेस, इंनोवेशन अँड एम्प्लॉयमेंट, न्यूझीलंड या कंपनी चे कर्मचारी असल्याचे भासवले.

Chinchwad News : महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी 2022 च्या महाअंतिम सौंदर्यस्पर्धेला  21 जानेवारी पासून सुरुवात

या कंपनी मध्ये वरिष्ठ पदासाठी नोकरी लावून देतो असे त्यांना ईमेल केले. इतकंच नाही तर कंपनी चे बनावट कागदपत्र, लेटर, व्हिजा देखील ईमेल केले. या तिघांनी फिर्यादीला इमिग्रेशन साठी पैसे लागतील असे सांगत बँक खात्याचा नंबर देऊन त्यात 7 लाख रुपये पाठवायला सांगितले. (Pune News) विश्वास संपादन झाल्यानंतर तसेच वरिष्ठ पदावर नोकरी मिळेल या अमिषाला बळी पडून फिर्यादी ने पैसे ट्रान्स्फर केले मात्र त्यानंतर कुठलाच संपर्क होऊ न शकल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.