Chakan News : किराणा दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले

एमपीसी न्यूज कामासाठी उसने पैसे घेऊन जात असताना किराणा दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून व कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. (Chakan News) हा प्रकार बुधवारी रात्री खेड जवळील वाटेकरवाडी येथे घडला आहे.

याप्रकरणी रोहिदास साहेबराव अरगडे (वय 35 रा. काळुस,खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पहिल्या फुफ्फुसाच्या बिलबोर्डचे उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा कामगार हे फिर्यादीच्या आत्याच्या घरून उसने पैसे  घेऊन त्यांच्या  टेंम्पो (एमएच14 एचयु 3212) तून घरी जात होते. (Chakan News) यावेळी चार अनोळखी इसम दोन दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या डोळ्यात मिर्चीपुड टाकून हातातील कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी व कामगाराला हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादी यांच्याकडील 90 हजार रुपये रोख व 8 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 98 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.