Pimpri Crime News: पिंपरी रेल्वे स्टेशन बाहेर महिलेशी रिक्षा चालकाचे गैरवर्तन

एमपीसी न्यूज –  रिक्षाचा महिलेच्या पर्सला धक्का लागला असता महिलेने जाब विचारला म्हणून रिक्षा चालकाने (Pimpri Crime News ) महिलेशी हुज्जत घालत गैरवर्तन केले.  हा प्रकार पिंपरी रेल्वे स्थानका बाहेर बुधवारी (दि.4) रात्री घडला.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालक (एम एच 14 जे.पी.7127) याच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

 

Chakan News : किराणा दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांची बहिण व  बहिणीची मुलगी यांच्यासोबत सिंहगड एक्सप्रेसमधून बुधवारी रात्री पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरल्या, यावेळी त्या रिक्षा स्टँडजवळ आल्या असता एका रिक्षाचा त्यांच्या पर्सला धक्का लागला, यावेळी फिर्यादी यांनी रिक्षा चालकाला नीट रिक्ष चालवता येत नाही का असा जाब विचराला, मात्र तो रिक्षा न थांबता तेथून निघून गेला. यावेळी आरोपीची रिक्षा स्टँड (Pimpri Crime News ) वर उभी होती. यावेळी आरोपीच रिक्षातून उतरून जा..जा तुझी काय औकात आहे म्हणून फिर्यादीच्या अंगावर धावून आला. तसेच त्याने फिर्यादाचा सर्वांसमोर हात पकडून त्यांना ढकलून दिले व हातात दगड घेऊन अंगावर धावून आला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.