Alandi : सततच्या वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या आजाराने आळंदीमधील नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : पावसाच्या विश्रांतीनंतर आळंदी शहरात (Alandi) मागील काही दिवस सकाळचे अल्पशा प्रमाणात ऊन, तर दिवसभर बराच वेळ ढगाळ वातावरण राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. सततच्या या वातावरण बदलामुळे त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाला आहे.

Eco friendly ganpati : चिंचवड येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान

शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी,अंगदुखी, श्वसन विकार इ. असे विविध आजार बळावू लागले आहेत. त्यामुळे दिवसभर दवाखान्यांंमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणीसाठी बसल्याचे दिसून येत आहेत. हवेतील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्ड्यात व कचऱ्याच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे (Alandi) डासांची मोठी पैदास झाली आढळून येत आहे. त्यामुळे डेंगू, मलेरियाचे इ.रुग्ण शहरात आढळून येत आहेत. विशेषतः सर्दी, ताप, खोकला या आजारांमुळे लहानासह ज्येष्ठ नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले दिसून येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.