Pimpri : विश्‍व श्रीराम सेनेतर्फे इंद्रायणी नदी परिसराची स्वच्छता

एमपीसी न्यूज – निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारे लोकपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छठ महापूजेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. उत्तर भारतात साजरा केला जाणारे हे लोक आस्थेचे महापर्व गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात देखील मोठ्या भक्‍तिभावाने पूर्ण केले जाते. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी-व्यवसायासाठी हजारोंच्या संख्येने बिहार व उत्तर प्रदेशाचे नागरीक वास्तव्यास आहेत. हे सर्व नागरीक येथे देखील नदी, तलावाच्या ठिकाणी हे व्रत पूर्ण करतात. जगातील हे एकमेव असे व्रत आहे ज्यात मावळत्या आणि उगवत्या सुर्याचे पूजन केले जाते.
सूर्य, जल, शेतपीक अशा सर्व बाबीं या व्रतात महत्त्वाच्या असल्याने या व्रतास निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारे लोक आस्था पर्व म्हटले जाते. यात कोणतेही मंत्र नसले तरी श्रद्धा आणि भक्‍तिभाव ओसंडून वाहत असतो. निसर्गाचे रक्षण आणि आदर करण्याची शिकवण देणाऱ्या या व्रतासाठी विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटन व सार्वजनिक छठ पूजा समितीच्या वतीने मोशी येथील टोल नाक्‍याजवळील इंद्रायणी नदी घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी या स्वच्छता मोहिमेत पिंपरी चिंचवड मनपाचे महापौर राहुल जाधव, विश्व श्रीरामसेनेचे अध्यध लालबाबू गुप्ता सहभागी झाले होते. यानिमात्ताने महापौर जाधव यांनी परिसराची पाहणी केली आणि ते म्हणाले की नदी घाट, परिसर छठपूजेसाठी स्वच्छ, सुंदर केला जात आहे. इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव साजरा करतात. त्यासाठी सर्व भाविकांना सर्वतोपरी मदत केली जाईल.सर्व नागरिकांनी अशाच पध्दतीने आपले घर ,परिसर, गल्ली, शहर स्वयंस्फुर्तीने स्वच्छ ठेवले तर भारत स्वच्छता अभियान यशस्वी होईल.
_MPC_DIR_MPU_II
विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की, छठपूजा हे एक महापर्व असून उत्तर भारतीय बांधवांचा मोठा सण आहे.या उत्सवाच्या निमित्ताने नदी स्वच्छता केली जाते.गंगा महाआरती या सणाच्या यामाध्यमातून भारतीय संस्कृतीत साजरे होणारे सर्व सण ,उत्सव जोडले जावेत, सर्व जाती धर्मामध्ये प्रेम ,सदभाव, वाढावा. सर्वामध्ये बंधुत्वाची भावना वाढीस लागावी .सर्वांनी एकत्र येऊन सण, उत्सव साजरे करावेत या उद्येशाने हा सण साजरा केला जातो. नद्या आपल्याला जीवन देतात. नद्यांबद्दल कृतज्ञ राहणे, हे आपले कर्तव्य आहे. म्हणून स्वच्छता उपक्रम घेतला जातो. आज नदी पात्रातील जलपर्णी, कचरा, फुलांचे हार, पिशव्या , प्लास्टिक बाटल्या, कागद, गोणपाट, थर्माकॉल, देवतांच्या मूर्त्या काढून नदीपात्र घाट परिसर स्वच्छ केला. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे संघटक प्रमोद गुप्ता , अक्रम शेख, शाम बाबू गुप्ता, धनंजय गुप्ता, शेखर गुप्ता, पृथ्वी प्रसाद, सत्यम गुप्ता, रोहित प्रसाद, किरण गायकवाड, रोहिदास फराटे, राधेशाम गौतम, अस्लम अन्सारी, विकास गुप्ता उपस्थित होते.
गंगा महाआरतीप्रमाणे इंद्रायणीची भव्य महाआरती
स्थानिक नागरीक देखील विश्‍व श्रीराम सेनेकडून साजरी केल्या छठ महापूजेची आतुरतेने वाट पाहत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे गंगा नदीच्या घाटावर महाआरती होते, तशीच आरती इंद्रायणी नदीची देखील केली जाते. कार्तिक शुक्‍ल पक्ष -छठ महापूजा इंद्रायणी मातेची गंगा महाआरती उत्सवा निमित्त सालाबाद प्रमाणे मोशी येथील टोल नाक्‍याजवळील इंद्रायणी नदी घाटावर मंगळवार दि.13 ते14 नोव्हेंबर दरम्यान छठ महापूजे निमित्त इंद्रायणी मातेती भव्य गंगा महाआरती व सार्वजनिक छठ महापूजा साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने पूजा, सांस्कृतिक, भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छठ पूजा कार्यक्रम सायंकाळी साडे पाच वाजता संपन्न होणर आहे. या उत्सवासाठी नऊ ते दहा हजार महिला पुरूष भाविक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याचे प्रमोद गुप्ता यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.