Pimpri News: शहरात छठ पूजा उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीय आणि बिहारी बांधवांनी आज (बुधवारी) सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देत छठ पूजा उत्साहात साजरी केली.

छठ पूजेसाठी उत्तर भारतीय महिला व्रत पाळतात. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उत्तर भारतीय महिला समर्पण भावनेने सूर्य देवतेची उपासना करीत छटपुजेचे व्रत मनोभावे करतात.

हिवाळ्यात थंड पाण्यात उभे राहून सूर्य आणि छठी मैया या देवतेची पूर्ण भक्तिभावाने पूजा महिलांनी केली.  मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यापूर्वी पूजेसाठी बांबूची टोपली फळे, उस, फुले, थेकुआ, तांदळाचे लाडू आणि पूजेशी संबंधित इतर वस्तूंनी सजवली होती.


विश्व श्रीराम सेना या संस्थेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी काठावार गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेश लांडगे, शिवभक्त मिलिंद एकबोटे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे महाराष्ट्र सदस्य अर्जुन गुप्ता, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, छठ पूजा समिती सदस्य, राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अरुण टाक तसेच विनोद गुप्ता, रोहित गुप्ता, गोदावरी महाविद्यालयाच्या प्राचार्य कुसुम गुप्ता आणि भक्त भाविक, महिला भगिनी उपस्थित होत्या.

शहरातील रावेत, थेरगाव, मोशी, इंद्रायणी घाट, केजूमाता घाटावर पूजा साजरी केली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  महापालिका प्रशासनाने शहरातील प्रत्येक घाटाची स्वच्छता केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.