Jyotishri All India Astrology Convention : ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप

अधिवेशनात ज्येष्ठ ज्योतिषांचा,संस्थांचा दीर्घ योगदानाबद्दल सत्कार

एमपीसी न्यूज – श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे आयोजित अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या (Jyotishri All India Astrology Convention) दुसऱ्या दिवशी 10 जून रोजी या क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांचा आणि संस्थांचा त्यांच्या दीर्घ योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. पंचांगकर्ते मोहन दाते, विजय जकातदार, उज्वल पावले, दर्शन शुक्ल, पुंडलिक दाते, शुभांगिनी पांगारकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

दुपारच्या सत्रात चंद्रकांत (दादा) शेवाळे (पुणे)यांना ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार, डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे, (पुणे) यांना ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार, चंद्रकला जोशी, (औरंगाबाद) यांना ज्योतिश्री आदर्श महिला ज्योतिर्विद पुरस्कार, देवदत्त जोशी, (सोलापूर ) यांना ज्योतिश्री पुरस्कार, भरत सटकर, (पुणे ) यांना ज्योती जोशी यांच्या हस्ते ज्योतिश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना नंदकिशोर जकातदार म्हणाले, ‘ ज्योतिष ही माझी आवड आहे.चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहिलो, की चांगले घडते. आपण सतत शिकत राहिले पाहिजे.

सायंकाळी श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने अधिवेशनाचा समारोप झाला.

Pune Crime News : ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 4 महिलांची सुटका, 11 जणांवर गुन्हा दाखल

अधिवेशनाचे (Jyotishri All India Astrology Convention) हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये दोन दिवस ज्योतिष विषयक अनेक सत्र पार पडली. मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

अभिजित प्रतिष्ठान, दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई व प्रा.रमणलाल शहा सर्च ॲण्ड रिसर्च ज्योतिष सेंटर, सातारा यांचे सहकार्याने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले . महाराष्ट्रातील दहा ज्योतिष संस्थांचा सक्रिय सहभाग यात होता.

भविष्याचे व्यवस्थापन ( ज्योती जोशी ), वास्तू मॅनेजमेंट ( डॉ. मकरंद सरदेशमुख ), अॅस्ट्रो मॅनेजमेंट ( विजय जकातदार ), विवाह योग ( प्रदीप पंडित ), वैवाहिक संबंध ( राजेश शर्मा ), फोर कप कन्सेप्ट ( सुनील पुरोहित ), आर्थिक प्रश्न -देवब्रत बूट, गुन्हेगारी ( डॉ. संजीवनी मुळे ), फसण्याचे योग ( डॉ. प्रसन्न मुळये ) यांनी दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन केले.

Hirvai Tapapurti Mahotsav : वनस्पतींच्या संरक्षण सज्जता समजून घ्यावी – डॉ. मंदार दातार

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

ज्योतिष अधिवेशनाच्या दोन दिवसांमध्ये तज्ज्ञ मान्यवर उपस्थित ज्योतिषप्रेमींना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, पुणे, ज्योतिषाचार्य अनिल चांडवडकर, नाशिक, नेहा शहा, पुणे, जयश्री बेलसरे, पुणे, संजय बुधवंत, पुणे, प्राचार्य रमणलाल शहा, सातारा, श्रीमती निलम पोतदार व ऋषिकेश सेनगुप्ता, मुंबई, डॉ. ज्योती जोशी, जळगाव, डॉ. मकरंद सरदेशमुख, पुणे, ज्योतिष पंडीत विजय जकातदार, पुणे, प्रदीप पंडीत, पुणे, राजेश शर्मा, सुनील पुरोहित, मुंबई, देवव्रत बुट, नागपूर, डॉ. संजिवनी मुळ्ये, पुणे, डॉ. प्रसन्न मुळ्ये, रत्नागिरी यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.