Pune Crime News : ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 4 महिलांची सुटका, 11 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क परिसरात स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या ठिकाणाहून चार महिलांची सुटका करण्यात आली तर 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जूनेल हुसेन इलास अली (वय ३२ वर्षे), राय सोलोमन (वय २६ वर्षे), विजय सुनिल पवार (वय २२ वर्षे), स्टिफन खांगबा रांग, (वय २५ वर्षे), महमद फुजेल अहमद सीराजिल हक (वय २२ वर्षे), काबूल हुसेन अमीर अली चौधरी (वय २६ वर्षे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पाच जणांचा शोध सुरू आहे.

MSEDCL News : महावितरणच्या भरारी पथकांची उत्तुंग कामगिरी; वर्षभरात 317 कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघड

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरेगाव पार्क परिसरातील गोल्डन स्पा याठिकाणी मसाज स्पा नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने पंचासमक्ष जाऊन डमी कस्टमरसह, सापळा रचून छापा कारवाई केली.

यावेळी तेथील पीडीत मुलींकडून मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसचे नावाखाली, जादा रक्कम चार्ज करुन, वेश्याव्यवसाय करीत असल्याचे खात्रीपुर्वक निदर्शनास आले. त्यावरुन सदर ठिकाणी पंचनामा करून, सदर स्पा चे काऊंटर वरील असिस्टंट मॅनेजर, सुपरवायझर, दलाल वगैरे काम करणाऱ्या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.