CM Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिली?

पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केलीय. (CM Eknath Shinde) या याचिकेची पुणे न्यायालयाने दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

 

Guru Purnima: देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. आता एकनाथ शिंदे यांना राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यामुळे पुणे न्यायालयाने आता याप्रकरणी चोकशीचे आदेश दिले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.