Jambulwadi : जेवणाच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून वेटरचे अपहरण

एमपीसी न्यूज – जेवणाच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून पाच गिऱ्हाईकांनीच वेटरचे अपहरण केल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी (दि.11 जुलै) रोजी रात्री आठ वाजता जांभूळवाडी येथील कात्रज बोगद्याजवळ असलेल्या हॉटेल रानमळा येथे घडला होता. याबाबत तक्रार मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासात वेटरची सुटका केली व पाच अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या.

Pune News: महिला आयोगाद्वारे 19, 20 व 21 जुलै रोजी जनसुनावणी

किशोर कोईराला असे अपहरण झालेल्या वेटरचे नाव आहे. तर, नितीन अशोक वाडेकर (वय 32), ओमकार जालिंदर बेंद्रे (वय 23वर्ष), रुपेश अशोक वाडेकर (वय 30 वर्ष), रविंद्र सकाहारी कानडे (वय 41 वर्ष), योगेश सर्जेराव पारधे (वय 25 वर्ष) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात हॉटेल मालकीण शारदा निलेश भिलारे यांनी माहिती दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल रानमळा येथे आरोपी हे त्यांच्या कारमधून जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर किशोर याने त्यांना जेवणाचे बिल मागितले. यावेळी आरोपींनी बील देण्यास नकार दिला व किशोर सोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी रागाच्या भरात उद्या तुम्हाला याच्या मरणाची बातमी मिळेल म्हणून किशोरला त्यांच्या कारमध्ये ढकलून घेऊन गेले. आरोपी हे जेजुरीजवळ डोंगरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करत पाचही आरोपींना बेड्या ठोकत किशोरची सुटका केली.

हि कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व त्यांच्या टीमने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.