Katraj Crime News : कात्रज बोगद्याजवळ लूटमार करण्यासाठी थांबलेले तिघेजण अटकेत

कोयत्यासह दोन लाखाची रोकड जप्त

एमपीसीन्यूज : महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडण्याच्या इराद्याने रात्रीच्या वेळी कात्रज बोगद्याजवळ दबा धरून बसलेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

ओंकार उमेश सातपुते (वय 21), प्रीतम विठ्ठल ठोंबरे (वय 19) आणि साहिल आनंद मोरे (वय 18) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून रोख 2 लाख 18 हजार, 1 पिस्टल आणि कोयते जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी संतोष भापकर, सचिन पवार व राहुल तांबे हे पेट्रोलिंग करीत असताना वरील आरोपी लूटमारीच्या इराद्याने कात्रज बोगद्याजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी जांभूळवाडी या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना घातक शस्त्रे सापडली. त्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

अटकेत असताना त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी आणखी एका साथीदाराचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी साहिल मोरे याला वारजेमाळवाडी परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून आंबेगाव बुद्रुक परिसरातून केलेल्या घरफोडीतील दोन लाख 18 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.