Pune News : घनकचरा व्यवस्थपनासाठी संगणक प्रणाली

एमपीसी न्यूज – घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दैनंदिन कामकाज सुरळीत करण्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीसाठी सुमारे १८ कोटी ५८ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील झाडणकाम, घरोघरी जाऊन कचरा संकलन, कचरा वाहतुकीचे व्यवस्थापन, कचऱ्यावर प्रक्रिया, शास्त्रोक्त भूळराव प्रकल्प, विविध प्रकारच्या कचरऱ्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक व व्यावसायिक शौचालये आदींच्या कामामध्ये या संगणक प्रणालीमुळे सुसूत्रता येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील हजेरी, करार, बिलिंग, जीपीएस सिस्टिम, आरएफआयडी, स्मार्ट वॉचेस यासाठी आवश्यक मॉड्यूल आणि आवश्यक असणारे हार्डवेअर पुरविण्यात येणार आहेत.

रासने पुढे म्हणाले, ‘या प्रणालीसाठी सुमारे ११ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी स्मार्ट सिटी उपलब्ध करून देणार असून, पंधराव्या वित्तीय आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून सुमारे ६ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीमधून औंध बाणेर बालेवाडीमधील यंत्रणेसाठी आवश्यक सर्व हार्डवेअर, संपूर्ण शहरासाठी सॉफ्टवेअर, मोबार्इल अप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.