Pune News : बारटक्के रुग्णालयात डायलेसिस केंद्र

एमपीसी न्यूज – वारजे येथील पुणे महापालिकेच्या अरविंद गणपत बारटक्के रुग्णालयात नेप्रोकेअर हेल्थ सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने डायलेसिस केंद्र सुरू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आप पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘शहरातील मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. किडनीचे आजार वाढत असून, त्याचा परिणाम रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होण्यात होतो. या रुग्णांना डायलेसिसचे उपचार घ्यावे लागतात. हे उपचार महागडे असतात. ते सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे बारटक्के रुग्णालयात डायलेसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति डायलेसिस ३७८ रुपये दर असणार्या निविदेला मान्यता देण्यात आली.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.