Pune Metro News : कल्याणीनगर मेट्रो स्टेशनसाठी जागा उपलब्ध

एमपीसी न्यूज – कल्याणीनगर येरवडा टी. पी. स्किम येथील जागा पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या कल्याणीनगर स्टेशनसाठी वाहनतळ, प्रवाशांना प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘एकूण ३९७.९७ चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची सध्याच्या रेडिरेकनरनुसार किंमत २ कोटी ३ लाख रुपये इतकी होते. ही जागा महामेट्रोला नाममात्र एक रुपये भाड्याने ३० वर्षांच्या कराराने देण्यात आली आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.