Pune News : संरक्षण विभागासाठी ड्वेलिंग युनिटच्या बांधकामासाठी मान्यता

एमपीसी न्यूज – संरक्षण विभागासाठी ड्वेलिंग युनिटच्या बांधकामासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘चांदणी चौकातील बहुउद्देशिय वाहतूक प्रकल्पासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ताब्यातील ०.४८ हेक्टर रस्त्याच्या जागेच्या सुमारे १६ कोटी ८८ लाख रुपयांच्या मोबदल्यापैकी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी पुणे महापालिकेकडे दिलेल्या सुमारे १६ कोटी ४० लाख इतक्या अनामत रकमेतून संरक्षण विभागासाठी ड्वेलिंग युनिटचे बांधकाम करणे आणि सल्लागाराला २ टक्के शुल्क देण्यास आली आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.