Pune : शिवसृष्टीचा आग्रह धरल्याने मानकर यांना ‘मोक्का’ मध्ये अडकविले – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे सभागृह आहे. या सभागृहात बोलताना शिवसृष्टीची आठवण येते. शिवसृष्टीचा एकही कागद हलला नाही. शिवसृष्टी नावाला राहिली आहे. नगरसेवक दीपक मानकर यांनी शिवसृष्टीचा आग्रह धरला म्हणून त्यांना मोक्वका लावण्यात आला का, हा संशोधनाचा विषय आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. 

दीपक मानकर यांच्यावर १७ केसेस होत्या. त्यांपैकी १६ केसेसमध्ये मानकर निर्दोष, तरी मोक्का कसा लावला? मानकर हे मोक्का कायदा लावण्यासारखे होते का? असा सवाल काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. कोण कोणाच्या पाठीमागे कशासाठी लागेल हे सांगता येत नाही. काट्याने काटा काढला जातो. एवढ्या खालच्या थराला जाऊन राजकारण केले जाते आहे, असा घणाघात अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेच्या नवीन सभागृहात झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत केला आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या निकृष्ट कामाबाबत अनेक वादानंतर अखेर कामकाजाला सुरुवात झाली आहे. या विषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणे महानगरपालिकेचे नव्या इमारतीमधील काही कामे पूर्ण करण्यास तीन महिन्याचा कालावधी लागला असून ती सर्व कामे पूर्ण झाली आहेत. गणेशोत्सवाचा मुहूर्त पाहून सभागृहाचे कामकाज सुरू केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.