BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चाकण येथे सोमवारी संविधान सन्मान मेळावा; भीमशक्ती संघटनेचा कार्यक्रम 

100
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – भीमशक्ती संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.११) चाकणमध्ये संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची चाकण येथे तयारी करण्यात आली असून, त्यानिमित्त रविवारी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी येथे संपन्न झाली.
.

चाकण गावच्या हद्दीतील मीरा मंगल कार्यालयात ११ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता या संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस आदींसह आंबेडकरी समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चाकणमध्ये या मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: