Crime news : बांधकामाच्या प्लास्टरचा राडारोडा पडला म्हणून शेजाऱ्याकडून कुटुंबाला मारहाण 

एमपीसी न्यूज – घराचे प्लास्टरचे काम करताना माल पडत असल्याच्या कारणावरून शेजारील कुटुंबाने पती, पत्नी आणि मुलाला मारहाण केली. (Crime news) ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुभाषवाडी निघोजे येथे घडली.

विठ्ठल राघु कुचेकर (वय 56, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश मोतीराम येळवंडे, मोतीराम येळवंडे, शुभम रमेश येळवंडे (सर्व रा. सुभाषवाडी निघोजे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : ‘डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशन’च्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी धनंजय जाधव यांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुचेकर यांच्या घराचे प्लास्टरचे काम सुरू आहे. ते काम करताना प्लास्टरचा माल शेजारी राहणाऱ्या आरोपींच्या घरावर उडाला. या कारणावरून आरोपींनी कुचेकर यांच्याशी हुज्जत घातली आणि कामगारांना दमदाटी करून काम थांबवले.(Crime news) त्यानंतर कुचेकर यांचा मोठा मुलगा प्रकाश याला आरोपींनी घरात ओढून घेत लाकडी बांबूने मारून जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची पत्नी गेले असता आरोपींनी त्यांनाही बांबू, लोखंडी सळई आणि दगडाने मारहाण केली. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.