Corona Vaccination : 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील कोमॉरबिड नागरिकांचे 1 मार्चपासून लसीकरण

एमपीसी न्यूज – देशात दोन कोरोना लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली. त्यानंतर 16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु झाले. आता 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील कोमॉरबिड नागरिकांना 1 मार्चपासून लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्चपासून 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील कोमॉरबिड नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

10 हजार सरकारी तर 20 हजार खासगी केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

खासगी केंद्रांवरुन लस घेणा-यांना लसीसाठी पैसे मोजावे लागतील. येत्या 3-4 दिवसांत आरोग्य विभाग याची किंमत ठरवेल. लसीच्या किंमतीबाबत लस उत्पादक आणि खासगी रुग्णालय यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

देशात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीला सुरुवात करण्यात आली. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात आतापर्यंत 1 कोटी 21 लाख 65 हजार 598 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.