Pune Corona Update : कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक 1147 नवे रुग्ण !

Corona's record break 1147 new patients!

एमपीसी न्यूज – कोरोनाचे आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मोडत बुधवारी तब्बल 1147 रुग्ण आढळले. आज सर्वाधिक 4 हजार 727 टेस्ट करण्यात आल्या. त्यामुळे रुग्ण वाढल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे.

शहरात कोरोनाचे आता 24 हजार 168 रुग्ण झाले आहेत. 587 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 14 हजार 998 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. 401 रुग्ण क्रिटिकल असून, त्यात 79 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनामुळे आज 19 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पर्वतीमधील एका 22 वर्षीय युवकाचा समावेश आहे. आतापर्यंत या रोगामुळे 770 नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. 8 हजार 400 ऍक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दांडेकर पूल परिसरातील 48 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, बुधवार पेठेतील 58 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, मंगळवार पेठेतील 60 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 59 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कौसर बागेतील 70 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, शुक्रवार पेठेतील 59 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 54 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, बेनकर वस्तीमधील 83 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, पांडवनगरमधील 75 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 22 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 70 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, शुक्रवार पेठेतील 57 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 51 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, हडपसरमधील 60 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 60 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 50 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, रविवार पेठेतील 64 वर्षीय महिलेचा आलायनस माऊंट हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 48 वर्षीय महिलेचा मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.