-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri: झोपडपट्टीतील नागरिकांची वारंवार तपासणी करा, आप युवा सेनेची मागणी

Coronavirus Update: Check slum dwellers health frequently demand by aap yuva sena in pimpri chinchwad

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- कोरोना या जीवघेण्या विषाणूने झोपडपट्टीत शिरकाव केल्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची वारंवार तपासणी करण्यात यावी अशी मागणी आप युवा सेनेने केली आहे.

आप युवा सेनेचे रणधीर नायडू यांनी आयुक्तांकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपासून शहरातील झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषतः आनंद नगर, रुपीनगर आणि भाटनगर येथील झोपडपट्टी परिसरात अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

झोपडपट्टीतील वाढणाऱ्या रुग्ण संख्येकडे महानगरपालिका प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे परिणाम भोगावे लागू शकतात, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी झोपडपट्टीतील नागरिकांची वारंवार तपासणी करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना कराव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या नागरिकांची वारंवार तपासणी केली जावी अशी मागणी आप युवा सेनेने केली आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn