BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कॉसमॉस बँक सायबर लूट प्रकरणी मोठे यश; 10 कोटींची वसुली होणार

एमपीसी न्यूज – पुण्यातील कॉसमॉस बँक सायबर लूट प्रकरणी मोठे यश मिळाले आहे. हाँगकाँगमधील बँकेने लुटारूंची जप्त केलेली रक्कम कॉसमॉस बँकेला पुन्हा परत मिळण्याची शक्यता असून कॉसमॉस बँकेला साधारण दहा कोटी परत मिळणार आहे. 

सायबर हल्ल्याच्या माध्यमातून कॉसमॉस बँकेचे तब्बल 94 कोटी भामट्यांनी लुटले होते. या सायबर हल्ल्यांना बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती. याप्रकरणी पंधरा जणांना अटक करण्यात आली होती. अद्यापपर्यंत मुख्य सूत्रधार यांचा तपास लावण्यात अपयश आले आहे.

.