Cricket Update : ‘बीसीसीआय’ची आज महत्वपूर्ण बैठक; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामासह 11 विषयांवर होणार चर्चा

BCCI's important meeting today; There will be discussions on 11 topics, including the national and international cricket season

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज (शुक्रवारी) होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत आयपीएल कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यासह विषयपत्रिकेमधील 11 मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या पूर्वार्धापर्यंत लीग घेता येऊ शकते, अशी ‘बीसीसीआय’ला आशा आहे.

‘आयपीएल’च्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिला पर्याय हा भारतातच स्पर्धा आयोजनाचा आहे, असे बीसीसीआय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

2021च्या T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत उत्सुक असला तरी ‘आयसीसी’ला केंद्र सरकारकडून कर सुटीचे प्रमाणपत्र ‘बीसीसीआय’ने सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा विषयसुद्धा ‘बीसीसीआय’च्या बैठकीत महत्त्वाचा असणार आहे.

कोरोनामुळे भारताचे तीन आंतरराष्ट्रीय दौरे रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे दौरे आणि मायदेशात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली आहे.

त्यामुळे भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.

 बैठकीत या 11 मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.

‘आयपीएल’चा कृती आराखडा, देशांतर्गत क्रिकेट हंगाम, आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाची कार्यक्रमपत्रिका, 2021च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी करसूट प्रमाणपत्र, बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील सुविधा, ‘बीसीसीआय’ आणि ‘आयपीएल’च्या डिजिटल करारांचे नूतनीकरण, बिहार क्रिकेट संघटनेमधील प्रशासकीय गोंधळ, ‘बीसीसीआय’च्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक, राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया, ईशान्येकडील राज्यांसाठीचे अनुदान, गणवेश करराच्या निविदांवर चर्चा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.