Talegaon Dabhade: वराळे येथील डी वाय पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा 100 टक्के निकाल

Talegaon Dabhade: 100 percent result of DY Patil Junior College of Science at varale कॉलेजचे 5 विद्यार्थी 85 टक्के, 13 विद्यार्थी 80 टक्के तर 22 विद्यार्थी 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

एमपीसी न्यूज- डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा बारावीचा 100 टक्के निकाल लागला आहे. या कॉलेजचे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयातील शिवम मोहबे ( 87 टक्के ), नरेंद्र मुहल (86 टक्के ), शैलेश करंडे (85टक्के ) यांनी अनुक्रमे  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. सुशांत पाटील आणि सचिव अ‍ॅड. अनुजा पाटील यांनी अभिनंदन केले आहे. संचालक प्रमोद पांडे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कॉलेजचे 5 विद्यार्थी 85 टक्के, 13 विद्यार्थी 80 टक्के तर 22 विद्यार्थी 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

शिवम मोहबे हा कॉलेजमध्ये प्रथम आला. त्याने मॅथेमॅटिक्समध्ये 94, बॉयलॉजी 92, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 92, फिजिक्स 71, केमिस्ट्री 74, तर इंग्रजीत 82 गुण मिळवून एकूण 87 टक्के मिळविले.

फिजिक्समध्ये 70 पेक्षा जास्त गुण मिळविणारे 13 विद्यार्थी, केमिस्ट्रीमध्ये 17, मॅथेमॅटिक्समध्ये 17 तर बॉयलॉजीमध्ये 9 विद्यार्थ्यांना 80 पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत.

या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे सकाळी 8:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नियमित शिकवणी वर्ग, अतिरिक्त वर्ग व डाऊट सेशन्स तसेच प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा अशी तयारी करून घेतली जाते.

कोटा राजस्थान येथील नामांकित मिरॅकल इस्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली बारावी बोर्डाच्या तयारी सोबतच मेडिकल प्रवेश परीक्षा नीट व इंजिनीअरिंगची प्रवेश परीक्षा आयआयटी जेईई व एमएचटी सीईटी या परीक्षेची सुद्धा तय्यारी करून घेतली जाते.

त्या करीता कोटा राजस्थान येथील अनुभवी प्राध्यापक व स्टडी मटेरियल तसेच ऑनलाइन व ऑफलाइन टेस्ट सिरीज नियमित घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीची संपूर्ण भीती निघून जाऊन आत्मविश्वास वाढतो.

सर्व विषयाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन सराव करून घेतात व परीक्षेला दिलेल्या वेळेआधी सर्व प्रश्न सोडविण्याचे शॉर्टकट मेथड शिकविल्या जाते. विद्यार्थ्यांना बॉयलॉजी ग्रूप व मॅथेमॅटिक्स ग्रूपची स्वतंत्र विषय निवडण्याचा पर्यायसुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.