Vadgaon Maval: मनसेमुळे डोंगरवाडीचा डोंगर पथदिव्यांनी उजळला

Vadgaon Maval: Due to MNS, the hill of Dongarwadi was illuminated by street lights ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेत मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी स्वखर्चातून हा परिसर पथदिव्यांनी उजळून काढला आहे.

एमपीसी न्यूज- मनसेच्यावतीने वरदायिनी मंदीर (वडगाव) ते डोंगरवाडी मार्गावर पथदिव्यांची सोय करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग अंधारात होता. त्यामुळे डोंगरावर राहणाऱ्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेत मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी स्वखर्चातून हा परिसर पथदिव्यांनी उजळून काढला आहे.

गावकऱ्यांच्या रोजच्या वापरासाठी व दैनंदिन दळण-वळणासाठी उपयुक्त व सोयीस्कर असणारा वरदायिनी मंदिर (वडगाव) ते डोंगरवाडी रस्ता असून या पाऊलवाटेवर अनेक वर्षांपासून पथदिवे व विजेची सोय नसल्याने रस्त्यावर रात्रीच्या वेळी खूप मोठा काळोख पसरत होता.

यामुळे डोंगरावर राहणाऱ्या शालेय विद्यार्थी, कामगार, दुधव्यावसायिक, शेतकरी तसेच डोंगराच्या निसर्ग सानिध्यात ट्रेकिंग व भटकंती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अंधारातून वाट शोधावी लागत असत.

याच अनुषंगाने नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या समस्येची दखल घेऊन व डोंगरवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार मनसेचे रुपेश म्हाळसकर यांनी वैयक्तिक खर्चातून व कार्यकर्त्यांच्या मदतीने वरदायिनी मंदिर ते डोंगरवाडी गाव या रस्त्यावर विद्युत पथदिवे बसवले.

मनसेच्या या समाजपयोगी कामातून संपूर्ण डोंगर विद्युत पथदिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळून निघाल्यामुळे गावकऱ्यांनी रूपेश म्हाळसकर व सर्व मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

या उपक्रमास नवनाथ शिवेकर, विकास साबळे, आकाश वारिंगे, सोमनाथ नवघणे, संतोष म्हाळसकर, सुरेश धनावडे, मिलिंद भवार, लहूदास म्हाळसकर, युवराज भोसले, गणेश म्हाळसकर, ओंकार भांगरे, विक्रम कदम यांचा हातभार लागला. त्याचबरोबर महावितरण आणि कानिफनाथ तरूण मंडळ, डोंगरवाडी यांचेही सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.