Chikhali : कामगार महिलांच्या कामाचे पैसे बुडवणाऱ्या कंपनी मालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलांकडून चार महिने काम करून घेऊन त्यांचे पगार बुडवणाऱ्या कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिखली शेलारवस्ती येथील एसएन इंडस्ट्रीज गियरबॉक्स असेम्बली कंपनीत 20 मे ते 29 ऑगस्ट या कालावधीत घडला.

सुनीता दिनकर महापुरे (वय 44, रा.घरकुल,चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निवास बापू चौघुले, शुभम निवास चौघुले (दोघे रा.नेवाळेवस्ती, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापलेकांची चिखली शेलारवस्ती येेथे एसएन इंडस्ट्रीएस गियरबॉक्स असेम्बली नावाने कंपनी आहे. फिर्यादी महिला या कंपनीत कामाला होत्या. महिना भरल्यानंतरही आरोपींनी त्यांना पगार दिला नाही. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी टाळाटाळ केली. अशा पाद्धतीने त्याने फिर्यादी यांचा 7 हजार रुपये प्रमाणे चार महिन्यांचा 28 हजार रुपयांचा पगार थकवला. फिर्यादी महापुरे यांच्यासह इतरही महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचा पगार बुडवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.