Crime News : दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज  – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे, एक कार जप्त करण्यात आली (Crime News) आहे.

सोमाटणे-कासारसाई रोडवर साळुंब्रे गावात एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती शुक्रवारी (दि. 27) दुपारी शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका हॉटेल समोर सापळा लावून सागर चंद्रकांत नखाते (वय 32, रा. सतेज चौक, औंधगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 400 रुपयांची दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करत नखाते याला अटक केली.

Chinchwad News : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

दुसरी कारवाई गुंडा विरोधी पथकाने पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली की, चाकण येथील एका हॉटेल समोर एकजण संशयितपणे थांबला आहे, त्याच्याकडे पिस्टल आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून प्रमोद उर्फ गोट्या अनिल शिंदे (वय 31, रा. रानमळा, कडूस, ता. खेड) याला ताब्यात घेतले. त्याच्या स्कॉर्पिओ कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी स्कॉर्पिओ कार, एक पिस्टल आणि दोन काडतुसे असा 10 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत प्रमोद याला अटक (Crime News) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.