Preksha Mehta Suicide: ‘क्राईम पेट्रोल’मधील अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

Crime Patrol Actress Preksha Mehta Commits Suicide

एमपीसी न्यूज- छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘क्राइम पेट्रोल’, ‘लाल इश्क’ आणि ‘मेरी दुर्गा’ सारख्या हिंदी मालिकेत अभिनय केलेल्या प्रेक्षा मेहताने सोमवारी रात्री इंदूर येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्रेक्षा अवघ्या 25 वर्षांची होती आणि एक वर्षांपूर्वीच ती मुंबईला आली होती.

दरम्यान, प्रेक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी आपली अखेरची इन्स्टा स्टोरी लिहिली होती. त्यात तिने “सबसे बुरा होता है सपनों का मर जाना.”, असे त्यात लिहिले होते. प्रेक्षाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. परंतु, लॉकडाऊनमुळे काम नसल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे

उल्लेखनीय म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मनमीतनंतर लॉकडाऊन दरम्यान आत्महत्या करणारी प्रेक्षा ही दुसरी कलाकार ठरली आहे. प्रेक्षा ही नाटकातही काम करत असत त्याचबरोबर तिला नृत्याचाही छंद होता. प्रेक्षाने मध्य प्रदेश स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे घेतले होते.

प्रेक्षा मेहताची अखेरची इन्स्टा पोस्ट
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like