pune : आमदार भीमराव तापकीर यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -जेजूरी भागातील मागासवर्गीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या पुतण्यासह ५ जणांवर जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर दमदाटी करत तिचे दागिने पैसे, शेतजमीन विकून फसवणूक करण्यात आली.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ रामदास यादव (माळशिरस, ता. पुरंदर), सागर मोकाशी, रामदास यादव, अभिषेक अर्जुन तापकिर (रा.धनकवडी), अभिषेक अनिल जगताप (सासवड ता. पुरंदर) अशा पाच जणांवर संगनमताने बलात्कार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.