Dapodi : मास्क आणण्यासाठी गेलेल्या मुलीसोबत गैरवर्तन

एमपीसी न्यूज – दुकानात मास्क आणण्यासाठी (Dapodi) गेलेल्या मुलीला पाठीमागून येवून तोंड दाबून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार दापोडी येथे घडला आहे. ही घटना मंगळवारी (दि.20) सायंकाळी घडली.

याप्रकरणी 14 वर्षीय मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

PCMC: समन्वयाच्या अभावामुळे प्रशासन अडचणीत; आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी हि तिच्या सोसायटीजवळील जनरल स्टोअरमधून मास्क खरेदी कऱण्यासाठी गेली होती. मास्क घेऊन ती परतत असताना अचानक कोणी तरी दोन्ही हाताने तिचे तोंड दाबून सोसायटी गेटच्या आतमध्ये अंधारात ओढून घेऊन गेला. यावेळी मुलीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली, मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तीने थेट घर गाठले, मुलगी घाबरली असल्याने (Dapodi) तिने गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, कोणी व का हा प्रकार केला याचा अद्याप तपास लागलेला नाही, भोसरी पोलिसांनी अज्ञाता विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.