Darren Sammy on Racism: मला ‘कालू’ म्हणणाऱ्यांनी माफी मागावी- डॅरेन सॅमी

Darren Sammy on Racism: Those who call me 'Kalu' should apologize says Darren Sammy IPL मध्ये खेळताना काही खेळाडू मला 'कालू' या नावाने हाक मारायचे आणि तशी हाक मारल्यावर इतर खेळाडू माझ्यावर हसायचे.

एमपीसी न्यूज- वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा माजी कर्णधार व सनरायझर्स हैद्राबाद या IPL संघाकडून खेळणारा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने मला ‘कालू’ म्हणणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी IPL मध्ये सनरायझर्स हैद्राबाद या संघाकडून खेळताना मला सुद्धा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता असा आरोप केला होता. दरम्यान, सॅमीने कोणाचेही नाव घेतलेले नसले तरी २०१४ मध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने सोशल मीडियावर सॅमीला ‘कालू’ असे म्हणणारी पोस्ट केली होती.

मी IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळताना काही खेळाडू मला ‘कालू’ या नावाने हाक मारत होते. त्यावेळेला त्या शब्दाचा काही तरी चांगला अर्थ असेल असा माझा अंदाज होता.

मात्र, काही दिवसानंतर माझ्या लक्षात आले ते माझ्या रंगाविषयी बोलत असून मला हिणवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा खुलासा काही दिवसांपूर्वी सॅमीने केला होता.

सॅमीने याबाबत आक्रामक पवित्रा घेतला असून मला ‘कालू’ म्हणणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. सॅमीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी क्रिकेट खेळण्यासाठी सर्व जगभर दौरा केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सर्वत्र मला प्रेम मिळाले. IPL मध्ये खेळताना काही खेळाडू मला ‘कालू’ या नावाने हाक मारायचे आणि तशी हाक मारल्यावर इतर खेळाडू माझ्यावर हसायचे.

या खेळाडूंनी मला संपर्क साधून त्यांनी केलेल्या चूकीबद्दल माफी मागावी नाहीतर त्या लोकांची माझ्याकडे नावे आहेत. तुम्ही त्यावेळेस जे काही बोलला त्याचा अर्थ मला कळला नाही.

मात्र आज त्याचा अर्थ व्यवस्थित कळत असल्याचे तो म्हणाला. दरम्यान, ख्रिस गेल याने सुद्धा त्याला पाठिंबा दिला असून न्याय मागण्यासाठी कधीच उशीर होत नसल्याचे त्यांने सांगितले आहे.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय माणसाच्या हत्येनंतर तिथे जोरदार आंदोलन करण्यात आले होते. सर्व जगात पुन्हा एकदा वर्णद्वेषाबद्दल आवाज उठवला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.