David Warner: जेव्हा डेव्हिड वॉर्नर अक्षय कुमार च्या ‘बाला’ गाण्यावर ताल धरतो तेव्हा…, पाहा VIDEO

David Warner: When David Warner Dance on Akshay Kumar's 'Bala' song वॉर्नरने अक्षय कुमारला हा व्हिडिओ टॅग करत 'जेव्हा तुमच्या जोकरांना तुमच्या नृत्याची कॉपी करायची असते' असे कॅप्शन दिले आहे.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमुळे डेव्हिड वॉर्नर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. त्याचे इंस्टाग्राम आणि टिकटॉक वरील व्हिडओ चाहत्यांकडून पसंत केले जात आहेत. वॉर्नरचे बॉलीवूड प्रेम आपण याअगोदरही पाहिले आहे मात्र, त्याने अक्षय कुमार’च्या बाला गाण्यावर केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.

लॉकडाऊन कालावधीत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरील त्याच्या मजेशीर व्हिडिओजमुळे चांगलाच चर्चेत राहिला.

त्याने दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू आणि अल्लू अर्जुन यांच्या गाण्यावर केलेला डान्स खूप व्हायरल झाला होता. डेव्हिड वॉर्नरने नुकताच अक्षय कुमारच्या प्रसिद्ध ‘बाला’ या गाण्यावर डान्स करत इंस्टाग्राम वर व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत त्याच्या दोन मुली डान्स करताना दिसत आहेत. वॉर्नरने अक्षय कुमारला हा व्हिडिओ टॅग करत ‘जेव्हा तुमच्या जोकरांना तुमच्या नृत्याची कॉपी करायची असते’ असे कॅप्शन दिले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया वरती खूप जणांनी पाहिला असून खूप मजेशीर कमेंट त्याच्यावरती केल्या आहेत. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल जॉन्सन यांनेसुद्धा हा व्हिडिओ लाईक केला आहे.

डेव्हिड वॉर्नरने यापूर्वी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या समवेत सुद्धा टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या फॉलोअर्सने त्याला स्वतःचे ओरिजनल व्हिडिओ बनवण्याची विनंती केली आहे. याला उत्तर देताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, मी यापुढे सुद्धा मजेशीर व्हिडिओ बनवत राहिन आणि माझ्या फॉलोअर्सला एंटरटेन करत राहिन असं म्हणाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.