Pimpri : स्वाईन फ्ल्यूने दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – स्वाईन फ्ल्यूने चिंचवड येथील एका दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. गेल्या नऊ महिन्यात स्वाईन फ्ल्यूने 31 जणांचा बळी घेतला आहे. तर, 59 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

वातारवणातील बदलामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला आहे. गेल्या नऊ महिन्यात तब्बल 31 जणांचा स्वाईन फ्ल्यूने बळी घेतला आहे. चिंचवड येथील एका मुलीला बुधवारी उपचारासाठी महापालिकेच्या वासयीएमएच्‌ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.