Deccan – डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून

प्रेत जाळून केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून करून ओळख पटू नये म्हणून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल रविवारी (दि.25) रात्री 10 च्या दरम्यान डेक्कन येथील नदीपात्राशेजारील रजपूत वीटभट्टी जवळ घडली.

सुनिल पडवळ (वय अंदाजे 40, रा. दत्तवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक चेतन चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री 10 च्या दरम्यान डेक्कन येथील नदीपात्राशेजारील रजपूत वीटभट्टी जवळ सुनिल पडवळ याच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अवजड वस्तूने मारून त्याला गंभीररित्या जखमी केले आणि त्यातच सुनिल यांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर त्या मारेक-याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सुनिलचा चेहरा विद्रुप केला आहे. या घटनेने डेक्कन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध डेक्कन पोलिस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.