Pimpri : निवडणुकांचा घसरता दर्जा..आणि सामान्य मतदार..!

(तन्मय डुंबरे)

एमपीसी न्यूज- सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत..प्रचाराला जोर आला आहे..अनेक महत्त्वाचे केंद्रीय पातळीवरचे नेते वेगवेगळ्या राज्यात जाऊन आपापल्या पक्षाचा प्रचार करीत आहेत.. परंतु यातील किती टक्के लोक मतदारांसमोर विकासाचे नवीन व्हिजन घेऊन येत आहेत..?? किती उमेदवार आणि प्रचारक विकासावर बोलत आहेत..??

वरील प्रश्न जर सामान्य मतदाराला विचारला तर अगदी काही टक्के उमेदवार ( देशभरात ) विकासावर किंवा..त्यांच्या व्हिजन वर बोलताना दिसून येतात. बाकी सगळे एकमेकांची जात काढत बसलेत, यात आपले पंतप्रधानही मागे नाहीत..कोणी देशाचा मागचा इतिहास काढत बसलेत,कोणी धर्माचे राजकारण करत आहे तर कोण काय.. कोण काय !! आज आपल्या देशासमोर एवढी संकटं आहेत,एवढ्या समस्यांचा डोंगर उभा आहे त्यावर मात्र कोणी बोलायला तयार नाही ..संपूर्ण तासाभराच्या भाषणामध्ये फक्त 5-1 मिनट हे विकासावर बोलतात बाकी संपूर्ण वेळ इतरांचे वाभाडे काढण्यात घालवतात.. मतदाराला तुमचे भाषण ऐकण्यात रस मुळीच नाही..त्याला रस आहे तुम्ही त्याच्या समस्या कश्या पद्धतीने सोडविणार आहात यामध्ये..परंतु या विषयावर बोलायला कोण लवकर तयारच होत नाही..

सध्याच्या राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात छापलेल्या खिरापती देण्याचे प्रकार पुढे देशासाठी घातक ठरू शकतात. काय तर न्याय योजना बेरोजगारांना.. त्यांना पेन्शन देण्याऐवजी नोकऱ्या उपलब्ध करून द्या ..लोकांना फुकटे बनवण्यामागे हे राजकीय पक्षच जबाबदार आहेत.. मतदाराला त्याच्या परिसराचा विकास अपेक्षित असतो..तुमचे भाषण कौशल्य किती चांगले आहे हे पाहण्यात त्याला रस नाही..तुम्ही लोकांसमोर विकासाचे मॉडेल घेऊन जा ..तुम्हाला प्रचाराची पण गरज उरणार नाही..मग तुमचे विरोधक तुमच्यावर कसलेही आरोप का करेनात..परंतु हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे की आपले उमेदवार विकासावर कमी आणि भलत्याच गोष्टीवर जास्त बोलतात..ते आपण मतदार या नात्याने थांबवलं पाहिजे.. कामे न करणाऱ्या व्यक्तीस घरी बसवले पाहिजे..लोकशाहीने आपल्यासारखा मतदाराला मतदान हा सर्वोच्च हक्क दिला आहे त्याचा वापर आपण केलाच पाहिजे..!!!!

देशासमोरील काही महत्त्वाचे प्रश्न :
1) बेरोजगारी
2) लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ
3) पुस्तकी शिक्षण ,आणि मूळ कृतीत असणारी तफावत..ज्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण न होणे
4) भ्रष्टाचार
5) दुष्काळ
6) समाजात वाढणारी धर्मांधता, जातीय तेढ

वरील प्रश्न आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत..( मी विकासच्या दृष्टीने प्रश्न मांडले आहेत ) त्याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे…अखेर माझे सर्व नेत्यांना आवाहन आहे..प्रचार करताना नैतिकता विसरू नका..विकासच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा..जाती धर्माचा उल्लेख करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुळीच करू नका ..अन्यथा ही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही…!!!

‘आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा..!!! ‘

(तन्मय डुंबरे हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.