Dehu Road : चार लाखांच्या फसवणूक प्रकरणी आई आणि मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज – गावाकडील जमीन विकून (Dehu Road) पैसे देतो, असे आमिष दाखवून उसने पैसे घेतले. जमीन विकल्यानंतर पैसे न देता फसवणूक केली. ही घटना 22 जानेवारी 2020 ते 29 ऑगस्ट2023 या कालावधीत इंदापूर तालुक्यातील गोतंडी येथे घडली.

प्रदीप दशरथ यादव (वय 36, रा. गोतंडी, ता. इंदापूर) आणि त्याची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजिनाथ विठ्ठल सावंत (वय 35 , रा. मामुर्डी, देहूरोड. मूळ रा. गोतंडी, ता. इंदापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maharashtra News : राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत आराखड्यास मान्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून गुगल पे आणि इतर माध्यमातून वेळोवेळी तीन लाख 89 हजार रुपये घेतले. गावाकडील जमीन विकल्यानंतर ते पैसे परत देतो, असे आरोपींनी फिर्यादीस सांगितले.

दरम्यान आरोपींनी गावाकडील जमीन विकली मात्र फिर्यादीचे पैसे परत केले नाहीत. जमीन विकल्याचे माहिती फिर्यादीस मिळाली असता त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करून फिर्यादीची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत (Dehu Road) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.