Dehu : तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान (क्षणचित्रे)

एमपीसी न्यूज – सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

आज सोमवारी (दि. २४) दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी संतशिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीने देहहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. विठू नामाचा गजर… टाळ मृदुंगाचा निनाद…. तुकोबा-तुकोबा नामाचा अखंड गजर… अन् मनी विठुरायाच्या भेटीची आस… अशा अत्यंत भक्तिरसपूर्ण वातावरणात अनेक वारकरी तल्लीन झाले होते. यावेळी लहान-थोरांसह अनेकांनी हा सोहळा पाहण्यासाठी एकाच गर्दी केली होती.

  • याच सोहळ्याची छायाचित्रे टिपली आहेत ‘एमपीसी न्यूज’चे छायाचित्रकार अमोल वाजगे यांनी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.