Dehugaon: देहूत श्री दत्त जन्म उत्सव सोहळ्याला सुरुवात

एमपीसी न्यूज – देहूगाव, विठ्ठलवाडी येथे श्री दत्त जन्म उत्सव सोहळ्याला मंगळवार (दि.18) पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणा-या या सोहळ्यात भजन, कीर्तन, भारुड असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

देहूतील सद्‌गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत हा सोहळा सुरु आहे. उद्‌घाटन सोहळ्याला देहूच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, माजी सरपंच रत्नमाला करंडे, शिवसेनेच्या शैला खंडागळे, सुनील हगवणे उपस्थित होते.

बुधवारी (दि.19)दुपारी तीन ते पाच या वेळेत सिद्धीविनायक महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता वारकरी शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरु जोग महाराज यांचे कीर्तन होणार आहे

गुरुवारी (दि.20)गुरुदत्त महिला भजनी मंडळ आणि गणेश विठ्ठल भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी भूम तालुक्यातील चिंचपूर येथील शांतीगिरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (दि.21)ओंकार महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी संतोष महाराज काळोखे यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी (दि.22) गुरुदत्त महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर, सायंकाळी ह.भ.प सुप्रिया कामठे यांचे कीर्तन होणार आहे.

कार्यक्रमाच्या संयोजनात सामाजिक कार्यकर्ते अण्णा भोरे, बाबुराव भोरे, विनोद पोळ, धनंजय भोसले, विनायक सूर्यवंशी, महादेव जाधव, संदीप चव्हाण, निवांत लांडे, मनोज सुतार, शुभम झोंबाडे, अनिल दळवी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना ह.भ.प क्षीरसागर महाराज यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.