Dehugaon: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवारी व्याख्यान अन् योग प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विद्याधाम योगविद्या गुरूकुल देहूगाव शाखेच्या वतीने उद्या (शुक्रवारी) ओंकार ध्यान, योगसाधना आणि मधुमेह या विषयावर व्याख्यान व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.

देहूगाव, येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नाशिक येथील योगविद्या गुरूकुलचे कार्याध्यक्ष प्रमोद निफाडकर यांच्यासह डॉ. शिल्पा नारायणन-मापुसकर या ’ओंकार ध्यान’ तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव ’योगसाधना आणि मधुमेह’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

  • याप्रसंगी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज मोरे, देहूच्या सरपंच पुनम काळोखे, तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, संत तुकाराम विद्यालयाचे प्राचार्य ईश्वर जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन योग विद्याधाम योगविद्या गुरूकुल देहूगाव शाखेचे अध्यक्ष प्रदिप माळी, दत्तात्रय भसे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.