Chinchwad : श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात योगदिन साजरा

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय योग दिन चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात (Chinchwad) विविध शिस्तबद्ध योग प्रात्यक्षिकांसह बुधवारी (दि.21) साजरा करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संचालक. विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ प्रात्यक्षिकांबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष शब्दांत कौतुक केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, ज्येष्ठ शिक्षक किसन आहिरे, सुचित्रा झेंडे,. प्रतीक्षा शिंदे तथा बालाजी मुंढे आदि उपस्थित होते.

विविध खेळाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन ( 21 जून ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासनातील आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव हे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षांच्या हस्ते विद्येची आराध्यदैवत असलेल्या सरस्वतीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रथम योगासनाचा इतिहास सांगून योगासानांचे मानवी जीवनातील महत्व विषद करण्यात आले.

त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्वांगसुंदर असे सूर्यनमस्कार आणि योगासनातील विविध चित्ताकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांमध्ये योगाबद्दल कुतूहल निर्माण केले. “योगाबद्दल समाजात जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. शरीर आणि मन यांचा योग्य समन्वय साधून उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी योगासन हे उत्तम माध्यम आहे. त्याचबरोबर योगामुळे व्यक्तीची अध्यात्मिक प्रगती साधली जाते.

त्याचबरोबर योगामुळे (Chinchwad) भारताच्या प्राचीन ज्ञानाचा जगाला परिचय होतो. जीवनात विविध परिस्थितीत संयम राखण्याची शक्ती योगामुळे प्राप्त होते आणि रोगप्रतिकारक्षमताही वाढते. आधुनिक काळात आपल्याला विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक आजार, कठिण आव्हाने, वाढत्या जबाबदाऱ्या, वाढत्या स्पर्धा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वाढता वापर अशा अनेक भयंकर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नियमित योग केल्याने आरोग्यदायी आणि सुखी जीवन जगणे सुलभ होते.” अशा शब्दांत विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना आणि सर्व उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. दैनंदिन जीवनात नियमित योग करून जीवन आरोग्यसंपन्न करण्याचा आणि योगाचे महत्व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा मौलिक संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडाशिक्षक . शब्बीर मोमीन यांनी केले, तर दत्तात्रय भालेराव यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.

PCMC: उपयोगकर्ता शुल्क वसुलीला भाजपचा विरोध

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.