Dehuroad : बनावट नंबर प्लेट लाऊन त्यावर पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक

Fraud of the government by filling fake car number plates

एमपीसी न्यूज – बनावट नंबर प्लेट लाऊन त्या नंबरवर वाहतुकीच्या नियमभंगाची पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक केल्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जून रोजी सायंकाळीतळवडे चौकात हा प्रकार उघडकीस आला आहे.

अक्षय शिवाजी मोरे (वय 24, रा. बाजार आळी, देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन लक्ष्मण निघोट (वय 37, रा. मोशी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याच्याकडे ‘आय 20’ ही कार आहे. त्या कारचा मूळ नंबर एमएच 14 \ जीएच 7767 असा आहे. हा मूळ नंबर त्याने कारच्या नंबर प्लेटवर न लावता एमएच 14 \ जीएच 0777 हा बनावट नंबर लावला.

दरम्यान, अक्षय याने कार चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याबाबत त्याच्या नंबरवर चलन फाडण्यात आले आहे. ती चलनाची रक्कम अक्षय याने भरली नाही.

बनावट नंबर प्लेट लावली तसेच नियमभंग केलेल्या दंडाची रक्कम न भरता अक्षय याने शासनाची फसवणूक केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.