Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कारणावरून एका व्यक्तीने तरुणाला (Dehuroad) बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 22) दुपारी बारा वाजताच्या सुमारास पारशी चाळ देहुरोड येथे घडली.

राहुल बलराज कागडा असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी करण बलराज कागडा (वय 26, रा. पारशीचाळ, देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप दिलबाग बोत (वय 35, रा. पारशीचाळ, देहुरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : घरफोडी करून चाळीस हजारांचे दागिने पळवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ राहुल (Dehuroad) हा बुधवारी दुपारी बारा वाजता दुचाकीवरून घरी आला. त्याने घराजवळ त्याची दुचाकी घराजवळ पार्क केली.

दुचाकी पार्क करण्याच्या कारणावरून संदीप याने राहुल यास शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये राहुल यांच्या डोक्यास दुखापत झाली आहे. देहुरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.