Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये आज  37 नव्या रुग्णांची नोंद;  226 सक्रिय रुग्ण, 14 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज शुक्रवारी  (दि.9) 37  नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1828 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली. 

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, रात्री पावणे नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1828 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  हद्दीत सध्या  226 सक्रिय रुग्ण आहेत.तर कोरोना उपचार पूर्ण झालेल्या 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 35 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आतापर्यंत एकूण 1566 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 146 रुग्ण असून हद्दीत एकूण 226  सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या 42  रुग्ण दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 36 मृत्यूंची नोंद झाली आहे.

आज आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

श्रीविहार (2), किन्हई (4), झेंडे मळा (1), मेन बाजार-जायका चाय परिसर, रिपब्लिक स्कूल परिसर (3), शितळानगर  नं 2 (2), साई स्पेस (1), लक्ष्मी पुरम (1), चिंचोली (8), दत्तनगर (2), इंद्रप्रस्थ (1),थॉमस कॉलनी (2), पारशी चाळ (1), प्रियदर्शनी बिल्डिंग (1), संकल्प नगरी (2), श्रीकृष्ण नगर (1), गणेश चाळ (1), शिवाजी नगर (1), उदयगिरी सोसायटी (3).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.